Maharashtra Breaking News Live : शिवसेना कोणाची? आजपासून सलग पाच दिवस सुनावणी – Marathi News | Maharashtra breaking news live updates latest marathi news today 29 november 2023 ncp shiv sena railway Maratha reservation cm eknath shinde ajit pawar sharad pawar manoj jarange patil bjp shivsena congress Latest Marathi News

Jitendra Zavar |
Updated on: Nov 29, 2023 | 7:38 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील…. राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी…. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या… वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking News Live : शिवसेना कोणाची? आजपासून सलग पाच दिवस सुनावणी

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Nov 2023 07:48 AM (IST)

    Maharashtra News : रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा कोसळला

    नाशिक जिल्ह्यातील मनमाडचा रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा कोसळला. या अपघातात सुदैवाने जिवित हानी झाली नाही. या पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्यामुळे इंदूर – पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शहाराचा दोन्ही भागाला जोडणारा हा पूल होता.

  • 29 Nov 2023 07:35 AM (IST)

    Maharashtra News : राष्ट्रवादी कोणाची? आज सुनावणी

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची की शरद पवार यांची यावर बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने दिलेली शपथपत्र खोटी असल्याचा दावा शरद पवार गटाने केला होता.

  • 29 Nov 2023 07:21 AM (IST)

    Maharashtra News : शिवसेना कोणाची? आजपासून सुनावणी

    शिवसेना कोणाची यावर आजपासून सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. दरम्यान ठाकरे गटाने दिलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.

मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : पुणे शहराकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ४० प्रवाशांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारत गौरव यात्रा रेल्वेत हा प्रकार घडला असताना नाशिक जिल्ह्यातील मनमाडचा रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा कोसळला. राज्यातील काही भागांत आजही पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. राष्ट्रवादी कोणाची? यावर निवडणुक आयोगात बुधवारपासून सुनावणी होणार आहे. शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

Source link