Maharashtra News in Marathi: Maratha Aarakshan Andolan manoj jarange patil Breaking News in Marathi| Eknath Shinde devendra fadnavis ajit pawar latest news in marathi

17:32 (IST) 2 Nov 2023

भारतातील दानशूरांकडून वर्षभरात ‘इतके’ कोटी दान; शिव नाडर दानकर्मात आघाडीवर, प्रतिदिन सरासरी ५.६ कोटी रुपयांचे दानकर्म

कुमार मंगलम बिर्ला, गौतम अदानी, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल, नंदन नीलेकणी आणि सायरस आणि अदार पूनावाला यांचा आघाडीच्या १० परोपकारी व्यक्तींमध्ये समावेश आहे.

सविस्तर वाचा…

17:32 (IST) 2 Nov 2023

मराठा आंदोलनाची धग : यवतमाळ जिल्ह्यातील मार्गांवर प्रतिबंधात्मक आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून जाणारे सर्व राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर व इतर मार्गांकरीता पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

सविस्तर वाचा…

17:10 (IST) 2 Nov 2023

सरकारच्या शिष्टमंडळांची जरांगे-पाटलांबरोबर चर्चा, उपोषण मागे घेण्याची विनंती

सरकारचं शिष्टमंडळांची जरांगे-पाटलांबोरबर चर्चा सुरु आहे शिष्टमंळाने जरांगे-पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. शिष्टमंडळामध्ये ४ मंत्री, २ निवृत्त न्यायमूर्ती आणि २ आमदारांचा समावेश आहे.

  • एक दोन दिवसांनी आरक्षण मिळत नाही, असं दोन्ही निवृत्त न्यायाधीशांनी जरांगे-पाटलांना सांगितलं.
  • मग कधी आरक्षण मिळणार? असा सवाल जरांगे-पाटलांनी निवृत्त न्यायाधीशांना केला.
  • अजून थोडा वेळ द्या. मराठ्यांना नक्की न्याय मिळेल. न्यायालयात घाईत घेतलेले निर्णय टिकत नाही. कुणबींना प्रमाणपत्र देण्यात येत, असं निवृत्त न्यायाधीशांनी जरांगे पाटलांना म्हटलं.
  • एक-दोन दिवसांत कुठलंही आरक्षण मिळत नाही – निवृत्त न्यायाधीश
  • मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? जरांगे-पाटलांचा निवृत्त न्यायाधीशांना सवाल
  • मराठा मागासवर्गीय नाहीत. ते सिद्ध करण्याचं काम आयोग करेल – निवृत्त न्यायाधीश
  • मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार – निवृत्त न्यायाधीश
  • कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यात नाहीतर राज्यात काम करा – जरांगे-पाटील
  • आम्ही अहवाल गोळा करत आहोत. एक-दोन महिन्यात अहवाल तयार होईल. त्यातून किती टक्के मराठा समाज मागास आहे, हे कळेल – निवृत्त न्यायाधीश
  • रक्ताचं नातं असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार – निवृत्त न्यायाधीश
  • जात पडताळणीचे तात्काळ आदेश देण्यात यावे – जरांगे-पाटील
  • 16:14 (IST) 2 Nov 2023

    भिडेवाड्यासंदर्भात रहिवाशांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; एका महिन्यात जागा रिकामी करण्याचे आदेश

    भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळली. स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्याने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

    16:12 (IST) 2 Nov 2023

    भिडेवाड्यासंदर्भात रहिवाशांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; एका महिन्यात जागा रिकामी करण्याचे आदेश

    भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळली. स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्याने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

    16:11 (IST) 2 Nov 2023

    आमदार अपात्रता प्रकरणी ‘या’ तारखेपासून नियमीत सुनावणी, विधानसभा अध्यक्ष नवीन वेळापत्रक सादर करणार

    “कागपदपत्रे ६ तारखेपर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. २१ तारखेपासून आमदार अपात्रता प्रकरणी नियमीत सुनावणी होईल. त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष वेळापत्रक सादर करतील. २१ तारखेला पहिला साक्षीदार तपासला जाईल,” अशी माहिती विधिमंडळातील सुनावणीनंतर वकिलांनी दिली आहे.

    16:10 (IST) 2 Nov 2023

    नाशिक : नाट्य परिषदेचे रंगभूमी दिन पुरस्कार जाहीर; महेश डोकफोडे यांचा रंगतपस्याने सन्मान

    महाकवी कालिदास कलामंदिरात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.

    सविस्तर वाचा…

    16:05 (IST) 2 Nov 2023

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटलांना फोन…

    नागपूर : देवेंद्र फडणवीसांचे प्रवक्ते नितेश राणे यांनी राहुल गांधी यांनी मनोज जरांगे पाटलांना फोन केला का? हे विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटलांना फोन का केला नाही हे सांगावे, असा प्रतिप्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. त्यांनी याबाबत चित्रफीत प्रसिद्ध केली आहे.

    सविस्तर वाचा…

    16:05 (IST) 2 Nov 2023

    हिवाळ्यात चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ; प्रदूषित दिवस वाढले मात्र धोकादायक प्रदूषणात घट

    चंद्रपूर: हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. धुके, थंडी आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होत असल्याने प्रदूषणात वाढ होते. हिवाळ्याच्या पहिल्याच महिन्यात चंद्रपूरच्या प्रदूषणाचे दिवस वाढले असून ३१ दिवसांपैकी ३१ दिवसही प्रदूषण आढळले आहे. मात्र, हे प्रदूषण जीवघेणे व धोकादायक नसल्याने ही बाब चंद्रपूरकरांसाठी समाधानकारक आहे.

    सविस्तर वाचा…

    15:44 (IST) 2 Nov 2023

    उरणकरांची तहान वाढली मात्र पाणी साठा घटला; उरणच्या पाणी कमतरतेला सिडकोचा आधार, जलस्त्रोत वाढीची प्रतीक्षा संपेना

    तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकणामुळे झपाट्याने लोकसंख्या वाढत असून उरणकरांच्या पाण्याची तहान भागविणारे जलस्रोत अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे रानसई धरणातून पाणी पुरवठा करतांना सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज उसने पाणी घ्यावे लागत आहे. सविस्तर वाचा…

    15:42 (IST) 2 Nov 2023

    भिडेवाड्यासंदर्भात रहिवाशांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; एका महिन्यात जागा रिकामी करून महापालिकेला देण्याचे आदेश

    भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळली. स्मारकासाठी तेरा वर्षे संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, सविस्तर वाचा…

    15:40 (IST) 2 Nov 2023

    जळगावमधील उपोषणात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग; मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना साद…

    जळगाव जामोद येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते पक्ष भेद विसरून एकवटल्याचे चित्र आहे. उपविभागीय अधिकारी ( महसूल) यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

    15:34 (IST) 2 Nov 2023

    बुलढाणा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, माजी मंत्री सुबोध सावजींचे राज्यपालांना साकडे; म्हणाले, “कायदा सुव्यवस्था लयास…”

    बुलढाणा: महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी खळबळजनक मागणी ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच राज्यपालांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी पूरक मागणीही त्यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

    सविस्तर वाचा…

    15:11 (IST) 2 Nov 2023

    द्वारकाधीश कारखान्यास पाच लाख टन ऊस मिळाल्यास तीन हजार रुपयांचा भाव

    पाच लाख टनापेक्षा अधिक ऊस उपलब्ध झाल्यास तीन हजार रुपये प्रति टन भाव देण्यात येईल, असे आश्वासन बागलाण तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिले.

    सविस्तर वाचा…

    14:55 (IST) 2 Nov 2023

    कालेश्वरम प्रकल्प म्हणजे ‘केसीआर फॅमिली एटीएम’, राहुल गांधींचे टीकास्र; मेडीगड्डा धरणाला भेट

    गडचिरोली : कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कुटुंबियांचे ‘एटीएम’ असून यात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाला भेट दिली. यावेळी आंबटपल्ली गावात झालेल्या सभेत त्यांनी हे आरोप केले.

    सविस्तर वाचा…

    14:55 (IST) 2 Nov 2023

    नागपूर : लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ, तेली समाजाकडून निषेध, दिला इशारा

    नागपूर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेचा तेली समाजाने जाहीर निषेध करत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरू व त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा निर्वाणीचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

    सविस्तर वाचा…

    14:54 (IST) 2 Nov 2023

    क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा! नागपुरात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० सामना होणार नाही, कारण…

    नागपूर : विश्वचषकाचा एकही सामना नागपूरमध्ये आयोजित केला नसल्याने शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये आधीच निराशा होती. क्रीडाप्रेमींचा रोष कमी करण्यासाठी नागपूरमध्ये १ डिसेंबरला भारत-ऑस्ट्रेलियाचा टी-२० सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर ‘ड्रेनेज’चे कार्य सुरू असल्याने हा सामनाही आता रायपूरमध्ये स्थानांतरित केला जाणार असल्याची माहिती आहे.

    सविस्तर वाचा…

    14:31 (IST) 2 Nov 2023

    ‘संजय पवार यांचा राजीनामा निव्वळ नाटक’, संचालक मंडळाचा आरोप

    जर त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा होता तर त्यांनी संचालक पदाचाही राजीनामा देणे अपेक्षित होते, असे संचालक मंडळाने म्हटले आहे.

    सविस्तर वाचा…

    14:23 (IST) 2 Nov 2023

    दुष्काळ जाहीर करण्यात धुळे जिल्ह्यावर अन्याय; माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची नाराजी

    भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाशी संबंधित ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

    सविस्तर वाचा…

    14:22 (IST) 2 Nov 2023

    घोडबंदर मार्गावर मध्यरात्री अवजड वाहतुकीला बंदी

    ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री प्रवेशबंदी लागू केली आहे.

    सविस्तर वाचा…

    14:10 (IST) 2 Nov 2023

    “…तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये”, मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

    “ज्यांनी मोगलांच्या तलवारी छातीवर घेतल्या. त्यांच्याच छातीवर सरकार तलवारी चालवत असेल, तर तुमची तुलना मोगलांबरोबर करण्याची वेळ येऊ नये,” असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

    14:10 (IST) 2 Nov 2023

    “मराठा कोण आहे? पाकिस्तान की अमेरिकेतील? आरक्षणावर अधिकार का नाही?” बच्चू कडूंचा सरकारला सवाल

    “ओबीसींना भेटलेले आरक्षण कमीच आहे. ओबीसींचा देशात वाटा जास्त आहे. पण, २७ टक्क्यांवर आरक्षण नाही. तर, ओबीसी आरक्षण वाढवून घ्या किंवा अ,ब,क,ड असे वर्ग करा. पण, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण थेट नाही म्हणणं, हा खूप चुकीचा संदेश आहे. मराठा ओबीसी नाही का? मग ते कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील आहे? मराठ्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? मराठ्यांचं मागासलेपण सरकारला माहिती नाही. महाराष्ट्रात वाढत चाललेला भेदभाव चुकीचा आहे. सगळीकडे मराठा कुणबी आहे. फक्त मराठवाड्यातील मराठा लिहिल्यानं चालत नाही,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

    13:05 (IST) 2 Nov 2023

    अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करावी – आमदार रविंद्र धंगेकर

    ससून रुग्णालयामधून फरार झालेल्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे.

    सविस्तर वाचा…

    12:47 (IST) 2 Nov 2023

    मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक

    ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले.

    सविस्तर वाचा…

    12:37 (IST) 2 Nov 2023

    मनोज जरांगे-पाटील यांचा तपासणीसाठी डॉक्टरांना नकार

    मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचा पथक सराटी येथे दाखल झालं होतं. पण, जरांगे-पाटलांनी तपासणी करून घेण्यास नकार दिला आहे.

    12:32 (IST) 2 Nov 2023

    मालेगावच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; दाभाडीत ट्रामा केअर केंद्राला मान्यता

    मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    सविस्तर वाचा…

    12:20 (IST) 2 Nov 2023

    ठाण्यात महापालिकेचे क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई कामगारांची तपासणी

    कामगारांमुळे ग्राहकांना क्षय रोगाची लागण होऊ नये या उद्देशातून हे अभियान शहरात राबविण्यात येत आहे.

    सविस्तर वाचा…

    12:10 (IST) 2 Nov 2023

    “सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे…”, रोहित पवारांची प्रतिक्रिया

    “सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे सरकारमध्ये संवाद नाही,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी दिली आहे.

    11:57 (IST) 2 Nov 2023

    बिघाडानंतर रोहित्र वेळेत बदला; वीज कंपन्यांच्या बैठकीत विश्वास पाठक यांचे निर्देश

    विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली.

    सविस्तर वाचा…

    11:40 (IST) 2 Nov 2023

    …अशी केली जाणार चक्रीवादळातून नागरिकांची सुटका, ९ नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात रंगीत तालीम; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उपक्रम

    चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल याबाबतची ही रंगीत तालीम असणार आहे.

    सविस्तर वाचा…

    11:35 (IST) 2 Nov 2023

    तिसऱ्या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन

    मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवशीय अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. आमदारांनी चक्काजाम केला आहे. यानंतर पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतलं आहे.

    11:29 (IST) 2 Nov 2023

    मराठा आंदोलनाची जायकवाडीच्या विसर्गाला झळ; काही धरणांची संयुक्त पाहणी रखडली

    जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रगतीपथावर असली तरी काही धरणांची संयुक्त पाहणी बाकी आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पथकाच्या देखरेखीत जायकवाडीसाठी पाणी सोडता येईल.

    सविस्तर वाचा…

    11:17 (IST) 2 Nov 2023

    इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी अमेय प्रभू

    अमेय प्रभू यांच्या नियुक्तीचे वृत्त सर्वप्रथम त्यांचे वडील, माजी केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्री सुरेश प्रभू यांनी समाजमाध्यमात टिप्पणीद्वारे दिले.

    सविस्तर वाचा…

    11:16 (IST) 2 Nov 2023

    लॅपटॉप आयातीसाठी ११० कंपन्यांचे परवाने मंजूर; ॲपल, डेल, लिनोव्होसह इतर कंपन्यांचा समावेश

    सध्या कोणतेही अर्ज प्रलंबित नाहीत. केवळ हैदराबादमधील एका कंपनीचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

    सविस्तर वाचा…

    11:15 (IST) 2 Nov 2023

    हिरे उद्योग गुजरातेत जाणार नाही, राज्यात लवकरच नवीन धोरण – सामंत

    हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या चर्चेत सत्यता नसून उलट देशातील सर्वात मोठे एकात्मिक ज्वेलरी पार्क नवी मुंबईत उभे राहत असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

    सविस्तर वाचा…

    11:14 (IST) 2 Nov 2023

    कल्याण-डोंबिवलीत रस्तोरस्ती फटाक्यांच्या स्टाॅलचे पीक; वाहतूक, पादचाऱ्यांना अडथळे

    शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याबरोबर शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

    सविस्तर वाचा…

    11:13 (IST) 2 Nov 2023

    डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण

    स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही स्वच्छतागृह तुंबली असल्याने तेथील निचरा फलाटावर होत आहे.

    सविस्तर वाचा…

    11:12 (IST) 2 Nov 2023

    काय सांगता! हिमालयातील बर्फाळ नदी नसून ही तर पिंपरीतील पवना नदी… प्रदुषणाने फेसाळलेल्या नदीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

    अवघी नदी फेसाळलेल्या स्वरूपात दिसत आहे. ही पवना नदी नव्हे तर हिमालयातील बर्फाळ नदी असल्याचा भास काही क्षण होतो.

    सविस्तर वाचा…

    10:52 (IST) 2 Nov 2023

    आधी ‘पेगासस’, आता ‘अ‍ॅपल’; विरोधकांवरील हेरगिरीवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

    राजकीय विरोधकांवर पाळत ठेवणे, त्यांचे फोन चोरून ऐकणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा आवडता छंद आहे. महाराष्ट्राचे फडणवीस सरकारही याला अपवाद नव्हते. त्यात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘अ‍ॅपल’ कंपनीने दिलेल्या फोन हॅकिंगच्या इशाऱ्याची भर पडली आहे. नेहमीप्रमाणे सरकारने फोन हॅकिंगचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, त्याच वेळी चौकशी करण्याचे आश्वासनही दिले आहे. म्हणजे एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा ‘आव’ आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून आपण ‘साव’ असल्याचा देखावा करायचा, अशी टीका शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

    वाचा सविस्तर…

    10:51 (IST) 2 Nov 2023

    जरांगे-पाटलांनी पाणी सोडलं, सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाणार

    मनोज जरांगे-पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे, मराठा त्यांना संरक्षण देतील, असं म्हणाले होते. पण, आज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी कोणताही राजकीय नेता नाही तर सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नसल्याचा निर्धार बुधवारी व्यक्त केला होता.

    Source link