Mumbai Maharashtra Breaking News Live : India vs Canada Latest Update| Eknath shinde Uddhav Thackeray Latest Marathi News

12:58 (IST) 25 Sep 2023

सावधान! तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’

आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 25 Sep 2023

गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक

पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे चोरट्यांनी व्यावसायिकाला सांगितले.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 25 Sep 2023

चोरट्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

यापूर्वीही मुंब्रा पनवेल महामार्गावर रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी लुटले होते.

सविस्तर वाचा…

12:53 (IST) 25 Sep 2023

द्रोणागिरीच्या रस्त्यांवर भर दिवसा पथदिवे सुरू, सिडकोच्या वीज विभागाचा सावळागोंधळ उजेडात

पुन्हा एकदा सिडकोच्या वीज वितरण विभागाचा सावळागोंधळ समोर आला आहे. उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडचा विकास केला जात आहे.

सविस्तर वाचा…

12:52 (IST) 25 Sep 2023

धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नाही, डाॅ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

बैठकीत धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण आणि सुविधा देण्यास विरोध करण्यात आला.

सविस्तर वाचा…

12:52 (IST) 25 Sep 2023

नागपुरात प्रलय, पण स्वतःला नागपूरचे सुपूत्र मानणारे फडणवीस अमित शाहांबरोबर गणेश दर्शनात दंग, शिवसेनेचा टोला

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “नागपुरातील पावसानं १० हजारांहून अधिक घरांचं नुकसान केलं आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतःला नागपूरचे सुपुत्र म्हणवतात. ते मातर नागपुरात या प्रलयाचा हाह:कार असताना मुंबईत गृहमंत्री अमित शाहांबरोबर गणेश दर्शनातत दंग होते. त्यामुळे फडणवीसांवर टीका झाली, या टीकेनंतर ते नागपुरात गेले. मुंबई सांभाळता येत नाही, असं आम्हाला नेहमीच म्हणायचे, परंतु, करोना असो, प्रलय असो किंवा मग लॉकडाऊन असो, शिवसेनेनं मुंबई उत्तमरित्या सांभाळली आहे. पण त्यांना नागपूर सांभाळता आलं नाही.

12:39 (IST) 25 Sep 2023

येवल्यात रहिम शेख यांच्या घरी गणेश, हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पुरणगाव येथे एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी गणेशोत्सवात धार्मिक एकात्मतेचे दर्शन होत आहे. रहिम (मुन्ना) शेख यांनी आपल्या घरी गणेशाची स्थापना केली असून हे गणेश स्थापनेचे हे त्यांचे पाचवे वर्षे आहे.

वाचा सविस्तर…

12:10 (IST) 25 Sep 2023

भाजपा कार्यकर्त्यांच्या बसचा अपघात, ३९ जण जखमी

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. संबंधित बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात एकूण ३९ प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित सर्वजण भोपाळमधील ‘कार्यकर्ता महाकुंभ’ कार्यक्रमासाठी जात होते. याठिकाणी आज (सोमवार, २५ सप्टेंबर) पंतप्रधान मोदी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

11:04 (IST) 25 Sep 2023

“पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा प्रदेशाध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (२४ ऑगस्ट) अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. तसेच चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांना म्हणाले, “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा.”

Source link