Maharashtra Breaking News Live : कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसे निवडणुकीच्या रिंगणात – Marathi News | Maharashtra breaking news live updates latest marathi news today 26 november 2023 Hingoli OBC Maha Melava Chhagan Bhujbal Vijay Wadettiwar Maratha reservation cm eknath shinde ajit pawar sharad pawar manoj jarange patil bjp shivsena congress Latest Marathi News

Jitendra Zavar |
Updated on: Nov 27, 2023 | 9:49 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील…. राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी…. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या… वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking News Live : कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसे निवडणुकीच्या रिंगणात

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Nov 2023 09:45 AM (IST)

    राज्य मागासवर्ग आयोगाची 1 डिसेंबर रोजी बैठक

    राज्य मागासवर्ग आयोगाची 1 डिसेंबर रोजी बैठक पार पडणार आहे. 1 तारखेच्या बैठकीत समाज घटकाचे सर्वेक्षण करणारे प्रश्नावली ठरणार आहेत. हे प्रश्न ठरवून सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर अहवाल शासनाला सादर केला जाईल. सर्वेक्षणासाठी लागणारा मनुष्यबळही मागण्यात येणार आहे.

  • 27 Nov 2023 09:30 AM (IST)

    चंद्रपुरात अवकाळी पावसाचा जोर वाढला

    चंद्रपुरात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवल्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. अचानक आलेल्या पावसाने गारठ्यात वाढ झाली आहे. विदर्भात दोन दिवस यलो अलर्ट दिला असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतातील गहू आणि चण्याच्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • 27 Nov 2023 09:16 AM (IST)

    पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ एक टँकर उलटला

    पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ एक टँकर उलटला. या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. पुणे महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण आठ अग्निशमन वाहनं कार्यरत आहेत. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारण्यात आले. तर पोलिस विभागाकडून वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. रस्ता व्यवस्थित सुरू होण्यासाठी अजून दोन तास लागणार आहेत.

  • 27 Nov 2023 08:57 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना तडाखा

    नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. गारपीट झाल्याने द्राक्ष बागांचं नुकसान झालं.  द्राक्ष पिकावर घडकुज, घडगळ यासह डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.  गहू, मका, भात या पिकांचं देखील नुकसान झालंय. तर नाशिक शहरात देखील दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळतेय. दिवसभरात 14 मिमी पावसाची नोंद झाली.

  • 27 Nov 2023 08:45 AM (IST)

    कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसे निवडणूक रिंगणात

    कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता अधिक रंग चढणार आहे. कारण कोकण पदवीधर मतदार संघासाठी आता मनसे निवडणूक रिंगणात उभी राहणार आहे. स्वबळावर मनसे कोकण पदवीधर मधून निवडणूक लढणार आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीतील उमेदवार म्हणून मनसेकडून प्रमोट केलं जातंय. कोकण पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला यात आता मनसे आपली ताकद आजमावणार आहे. भाजपला आपण नक्कीच टक्कर देवू आणि जिंकू देखिल येवू असा विश्वास अभिजित पानसे यांनी व्यक्त केलाय.

  • 27 Nov 2023 08:30 AM (IST)

    नागपूर महानगरपालिका आता थकीत वसुलीसाठी रस्त्यावर उतरणार

    नागपूर महानगरपालिका आता थकीत वसुलीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.  अतिरिक्त आयुक्तांनी दिले मालमत्ता कर वसुलीचे आदेश दिलेत. नागपूर महानगरपालिकेचे बजेट सादर करताना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागात तीनशे कोटीचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.  आता मालमत्ता कर वसुलीवर भर द्यायला सुरुवात केली आहे. पाच लाखापेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांकडे उपायुक्त स्वतः जाऊन कर वसुली करणार असल्याचा सुद्धा पुढे येत आहे.

  • 27 Nov 2023 08:15 AM (IST)

    चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात; सात जण जखमी

    चाळीसगावच्या कन्नड घाटात रात्रीच्या अंधारात भीषण अपघात घडला आहे.  धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीररित्या जखमी झाले आहे. अक्कलकोट येथून दर्शन घेऊन हे सर्व मालेगाव कडे प्रवास करत होते. जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

  • 27 Nov 2023 07:57 AM (IST)

    Marathi News | अहमदनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

    अहमदनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

  • 27 Nov 2023 07:47 AM (IST)

    Pune News | ५ महिन्यांपासून राज्याला आरोग्य संचालकाची प्रतिक्षा

    राज्याच्या आरोग्य विभागाला गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य संचालक नाही. आरोग्य संचालकाची अजूनही आरोग्य खात्याकडून नियुक्ती झालेली नाही. यामुळे अनेक फाईली आरोग्य संचालकांच्या सही विना पडून आहेत.

  • 27 Nov 2023 07:32 AM (IST)

    Pune News | ससूनमध्ये अजूनही डीन नाही

    मॅटने निर्णय देवून डॉक्टर विनायक काळे यांची ससूनच्या डीनपदी नेमणूक करण्यात आलेली नाही. राज्याच्या वैद्यकीय विभागाने अजून विनायक काळे यांची ऑर्डर काढली नाही. डॉक्टर संजीव ठाकूर हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात वादात सापडले होते.

  • 27 Nov 2023 07:18 AM (IST)

    Marathi News | शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने एक तास धुमाकूळ घातला. डोलखांब भागातील साखरपाडा, ढाढरे, शिरोशी, रसाळपाडा, पाचघर या गावांमधील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : राज्यात अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे शहरात गारपीटसह पाऊस झाला. मुंबईत सोमवारी ढगाळ वातावरण आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा जिंतूरमध्ये दाखल झाली आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

Source link