Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर… | Maharashtra Politics News Live Updates: Maratha Aarakshan Andolan manoj jarange patil gunratna sadavarte Latest News in Marathi| Marathi Batmya

11:11 (IST) 26 Oct 2023

बापरे! एकाच दिवशी तब्बल १.१३ लाख लोकांचा मेट्रोतून प्रवास

नागपूर: २४ तारखेला विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात होणाऱ्या गर्दीचा फायदा महामेट्रोला झाला. मंगळवारी एकाच दिवशी मेट्रोतून सुमारे १.१३ लाख प्रवाशांनी प्रवास केला.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 26 Oct 2023

“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, कारण…”; गुणरत्न सदावर्तेंची आक्रमक मागणी, म्हणाले…

महाराष्ट्रात अशा घटनांची मालिका सुरू आहे. पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झालेली ही मालिका आज माझ्या घरावरील हल्ल्यापर्यंत येऊन ठेपली आहे. बस झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले, अशा मनोज जरांगेंना क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट, सेक्शन ७ नुसार तातडीने अटक करा. त्यांच्या मुसक्या बांधा, कारवाई करा.

– गुणरत्न सदावर्ते

11:08 (IST) 26 Oct 2023

अंधश्रद्धेपोटी घरी जाऊन टाकल्या हळद कुंकू लावलेल्या वस्तू; नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या…

चंद्रपूर: राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीपुर्वी या निवडणूकीत आपल्याला सत्ता मिळावी, या लालसेपोटी संस्थेतील एका संचालकाने आपल्या नातलग व्यक्तींना सामिल करीत अन्य संचालकांच्या घरी जाऊन सोफ्यात काळा धागा बांधून हळद, कुंकू लावून काही अवांछनीय वस्तू ठेवल्या.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 26 Oct 2023

रानडुक्कर आडवे आले अन गस्तीवरील पोलीस वाहन…

यवतमाळ: रात्रगस्तीवर असलेले कळंब पोलीस ठाण्याचे वाहन करळगाव घाटातील दरीत कोसळले. रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचा वाहनवरील ताबा सुटून ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 26 Oct 2023

उपराजधानीत पुन्हा खूनसत्र! चोवीस तासांत दोन हत्याकांड

नागपूर: उपराजधानीत पुन्हा एकदा खूनसत्र सुरु झाले असून गेल्या चोवीस तासांत दोन हत्याकांडांनी शहर हादरले आहे. सध्या सण-उत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाच हत्याकांड घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 26 Oct 2023

ठाणे: मेट्रोच्या कामांमुळे वाहतुक बदल

ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुक बदल लागू करण्यात आले असून यानुसार या रस्त्यावरील पर्यायी मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहे, असे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले.

वाचा सविस्तर…

11:03 (IST) 26 Oct 2023

उल्हासनगर: अपूर्ण रस्ते कामाचा वाहनचालकांना फटका

उल्हासनगर: दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांवर येणारा भार लक्षात घेऊन डोंबिवलीजवळील काटई नाका ते अंबरनाथ हा रस्ता काँक्रीटचा करण्याचे ठरवले. त्याचे कामही बहुतांशी पूर्ण झाले. परंतु या रस्त्याच्या दोन काँक्रिट तुकड्यांना जोडण्याचे काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याचे काँक्रीटीकरण करूनही रस्त्यावर खड्ड्यांचा अनुभव येतो आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

वाचा सविस्तर…

10:56 (IST) 26 Oct 2023

‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे!’ साताऱ्यात शासकीय अधिकाऱ्याच्या फलकाची चर्चा

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाबाहेर चक्क ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावत गैरमार्गाने काम करू इच्छिणाऱ्यांना एकप्रकारे चाप लावला आहे.

सविस्तर वाचा…

10:55 (IST) 26 Oct 2023

बीड जिल्ह्यातील दोन भीषण अपघातात १० जण ठार; खासगी बस उलटून ६ तर रुग्णवाहिका मालमोटारीवर आदळून ४ जणांचा मृत्यू

गुरुवारी पहाटे दोन अपघातांच्या वृत्ताने जिल्हा हादरला आहे.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 26 Oct 2023

धक्कादायक! किरकोळ वादातून मुलाने आईला जिवंत जाळले; अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार येथील घटना

जयेशने जखमी आईला मोकळ्या जागेत नेले. तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला पेटवून दिले.

सविस्तर वाचा…

10:47 (IST) 26 Oct 2023

पाणी, चहा पिऊ का, जेवण करू का, झोपू का हे विचारायला यांना दिल्लीला जावं लागतं – संजय राऊत

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज एकदाच दिल्ली, आग्र्याला गेले आणि सगळ्या खानांना, दिल्लीश्वरांना धडा शिकवून आले. एकनाथ शिंदेंना चहा घेऊ का, पाणी पिऊ का, जेवण करू का, झोपू का हे सर्व विचारायला दिल्लीत जावं लागतं. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

– संजय राऊत (खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)

10:42 (IST) 26 Oct 2023

“दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं, त्यांना वारंवार…”; राऊतांची घणाघाती टीका

महाराष्ट्रातील नेते वारंवार दिल्लीत जात आहेत. यापर्वी असं होत नव्हतं. एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत असा दावा करतात. मी बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असाही ते दावा करतात. मात्र, दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं आहे. त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागत आहे.

– संजय राऊत (खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)

10:37 (IST) 26 Oct 2023

पंतप्रधान आज शिर्डी दौऱ्यावर; निळवंडे धरणासह विविध विकासकामांचे लोकार्पण

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे, तसेच अन्य विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येत आहेत. या जोडीने मोदींच्या उपस्थितीत येथे एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हजारोंच्या उपस्थितीत हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे या दौऱ्याचे आयोजक महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण  विखे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

10:23 (IST) 26 Oct 2023

महाराष्ट्रातील भाजपा नेते भ्रष्ट व अकार्यक्षम असल्यामुळे ते मोदींना बोलावत आहेत – संजय राऊत

या राज्यातील नेतृत्व भ्रष्ट आणि अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार महाराष्ट्रात बोलावत आहेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून देशात कुठेही जातात. उद्या ते इस्रायललाही जाऊ शकतात. मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. ते पंतप्रधान आहेत, भाजपाचे सन्माननीय नेते आहेत.

– संजय राऊत (खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)

10:18 (IST) 26 Oct 2023

“पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्र दौरे करत आहेत, कारण…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात, मुंबईत आणि शिर्डीत इकडे तिकडे फिरत आहेत. कारण त्यांनी महाराष्ट्रात जो जुगाड केलाय तो हरणार आहे हे दिसत आहे. त्यामुळे एका भितीतून, एका निराशेतून हे दौरे सुरू आहेत. असं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येण्याविषयी कोणतीही बंधनं असू शकत नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदींना वारंवार राज्यात बोलावत आहेत कारण त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

– संजय राऊत (खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)

10:14 (IST) 26 Oct 2023

VIDEO: गाड्यांची तोडफोड, संतापलेल्या गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुलगी आणि पत्नीला उचलून…”

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.

सविस्तर वाचा…

Source link