Maharashtra Breaking News Live : विधानसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा, एक्झिट पोल येणार – Marathi News | maharashtra breaking news live updates latest marathi news today 30 november 2023 election exit poll ncp shiv sena railway Maratha reservation cm eknath shinde ajit pawar sharad pawar manoj jarange patil bjp shivsena congress Latest Marathi News

Jitendra Zavar |
Updated on: Nov 30, 2023 | 10:51 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील…. राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी…. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या… वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking News Live : विधानसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा, एक्झिट पोल येणार

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Nov 2023 10:51 AM (IST)

    येवल्याच्या सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक, ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा

    येवल्याच्या सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मराठा आंदोलक एकवटले आहेत. ‘भुजबळ गो बॅक’ अशी जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे.

  • 30 Nov 2023 10:33 AM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांची वक्तव्यं अतिशय बालिशपणाची – सुनील तटकरे

    पृथ्वीराज चव्हाण यांची वक्तव्यं अतिशय बालिशपणाची आहेत, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.

  • 30 Nov 2023 10:28 AM (IST)

    अहमदनगर – दुधाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

    दुधाला भाव मिळावा यासाठी नगर – पाथर्डी रोडवरील मेहकरी येथे शेतकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. गाईला दुग्धाभिषेक घालून आणि दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. दुधाला भाव न मिळाल्यास या गाईला मंत्रालयात घेऊन जाणार असल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला .

  • 30 Nov 2023 10:19 AM (IST)

    दत्ता दळवी यांचा मुलगा संजय राऊतांच्या भेटीला

    दत्ता दळवी यांचे पुत्र योगेश दळवी हे संजय राऊतांच्या भेटीसाठी आले आहेत. दळवी यांना अटक आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड झाल्यानंतर योगेश दळवी यांनी राऊत यांची भेट घेतली.

  • 30 Nov 2023 10:13 AM (IST)

    गाडी फोडणारे मर्द असते, तर तिथे थांबले असते – संजय राऊत

    गाडी फोडणारे मर्द असते, तर तिथे थांबले असते . राज्यातील सरकार नामर्द, अशी टीका राऊतांनी केली.

  • 30 Nov 2023 10:08 AM (IST)

    राज्यातले सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग – संजय राऊत

    राज्यातले सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग . शेतकऱ्यांवर संकट असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 30 Nov 2023 09:55 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर शहरात 5 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

    छत्रपती संभाजीनगर शहरात 5 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. शहरातील वेगवेगळ्या व्यावसायिकांवर हे छापे टाकले आहेत. कर चुकवल्याप्रकर्णी छापेमारी झाल्याची माहिती समोर येत आहे. काही व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.

  • 30 Nov 2023 09:54 AM (IST)

    अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मराठवाड्यातील 60 हजार हेक्टरांवरील पिकांचं नुकसान

    अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मराठवाड्यातील 60 हजार हेक्टरांवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे तब्बल 60 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे गटाकडून नुकसानग्रस्त भागात एकरी 50 हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.

  • 30 Nov 2023 09:45 AM (IST)

    मराठा समाजाच्या विरोधामुळे छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्याचा मार्ग बदलला

    मराठा समाजाच्या विरोधामुळे छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्याचा मार्ग बदलला. येवल्यातील विंचूर चौफुलीजवळ निदर्शने सुरू असल्याने त्यांनी आपला मार्ग बदलला. सकल मराठा समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना विरोध केला जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची  पाहणी करणार आहेत.

  • 30 Nov 2023 09:35 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांकडून नोटीस

    सोलापूर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे. ऊस गळपाची माहिती न दिल्याने जिल्ह्यातील सात कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही माहिती न दिल्याने अखेर नोटीस बजावण्यात आली. याबाबत आज साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांच्याकडे सुनावणी होणार आहे. लोकमंगल माऊली, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, मातोश्री लक्ष्मी, इंद्रेश्वर, सांगोला आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे या कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे.

  • 30 Nov 2023 09:20 AM (IST)

    मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर

    पुणे : मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे. पुणे महानगरपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. दुकानांवर मराठीतून पाट्या लावा, असं परिपत्रक पुणे महानगरपालिकेने शहरभरात व्यापाऱ्यांसाठी दिले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत पुणे महानगरपालिका उद्यापासून तपासणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

  • 30 Nov 2023 09:05 AM (IST)

    भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध

    छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. मात्र भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे.

  • 30 Nov 2023 08:57 AM (IST)

    ससून रुग्णालयाकडून सलाईनच्या बाटल्यांची खरेदी

    पुण्यातील ससून रुग्णालयाकडून सलाईनच्या बाटल्यांची अखेर खरेदी करण्यात आली आहे.  रुग्णालय प्रशासनाकडून 38 हजार सलाईन बाटल्यांची खरेदी केलीय. तीन महिने पुरेल इतक्या सलाईन बाटल्यांचा साठा ससून रुग्णालयाकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा होता. मात्र आता स्थानिक बाजारातूनच ससून रुग्णालय प्रशासनाकडून सलाईन बाटल्यांची खरेदी केली आहे.

  • 30 Nov 2023 08:45 AM (IST)

    राजू शेट्टी यांंचं अमित शाह यांना पत्र

    कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दोघांनाही पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचीही विनंती केली आहे.

  • 30 Nov 2023 08:30 AM (IST)

    26 हजार अपात्र शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ

    अमरावती जिल्ह्यातील 26 हजार अपात्र शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर 2 हजार शेतकऱ्यांनी रक्कम परत केली. अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेला लाभ परत न केल्यास  कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सर्वाधिक अपात्र शेतकरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आङेत.

  • 30 Nov 2023 08:15 AM (IST)

    खासदार हेमंत पाटील याांना राष्ट्रपतींचा समन्स

    हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समन्स पाठवला आहे.  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकसभा अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून हेमंत पाटील यांनी संसदेच्या कुठल्याही कामकाजात उपस्थित नाहीत. त्यामुळे 4 डिसेंबर रोजी संसदेत हजर राहण्याचं समन्स राष्ट्रपतींनी पाठवला आहे.

  • 30 Nov 2023 07:58 AM (IST)

    Maharashtra News : डोंबिवलीत एमडी ड्रग्स विक्री

    डोंबिवलीत हाय प्रोफाइल सोसायटीत एम.डी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५८ ग्रॅम ड्रग्स २ लाख २३ हजार रोकड जप्त करण्यात आली.

  • 30 Nov 2023 07:47 AM (IST)

    Maharashtra News : म्हाडाच्या ५८६३ घरांसाठी ५ डिसेंबरला सोडत

    म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांसाठी ५ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी ५९ हजारांहून अधिक जणांना अर्ज केले आहे. सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती.

  • 30 Nov 2023 07:36 AM (IST)

    Maharashtra News :PMPL खरेदी इलेक्ट्रिक बसेस

    पीएमपी स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेत आहे. शिवाय ३०० नवीन बस या भाडेतत्वावर घेत आहे. या आठवड्यात निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात ३०० ‘सीएनजी’ व १०० इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.

  • 30 Nov 2023 07:18 AM (IST)

    Maharashtra News : एनडीएच्या दीक्षांत समारंभ

    पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन झाला. प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएची 145 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दीक्षांत या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आज शेवटचा टप्पा होत आहे. तेलंगणामधील ११९ जागांवर मतदान सुरु झाले आहे. पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. पाचही राज्यात कोण सरकार बनवणार? जनतेचा कल दाखवणारा एक्झीट पोल गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेनंतर येणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन आज होत आहे. त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झाल्या. एनडीए कॅडेडटने चित्तथराक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आरोपी हरीश पंत, अरविंद लोहारे, इब्राहिम शेख यांचे बँक डिटेल्स पोलिसांना मिळाले आहे. शिवसेना कोणाची यावर आजही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

Source link