Maharashtra Breaking News Live : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात – Marathi News | Maharashtra breaking news live updates latest marathi news today 26 november 2023 Hingoli OBC Maha Melava Cnnagan Bhujbal Vijay Wadettiwar Maratha reservation cm eknath shinde ajit pawar sharad pawar manoj jarange patil bjp shivsena congress Latest Marathi News

आयेशा सय्यद |
Updated on: Nov 26, 2023 | 8:12 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील…. राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी…. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या… वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking News Live : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Nov 2023 08:30 AM (IST)

    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन

    बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.  सोयाबीन , कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तुपकर  बेमुदत आंदोलन करत आहेत.  काल तुपकर याना न्यायालयाने जामीन दिल्यावर तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. चिखली तालुक्यातील सोमठाना गावात आंदोलन सुरू आहे.  तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 29 नोव्हेंबर ला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.तुपकर यांनी आंदोलन करू नये, म्हणून पोलिसांनी काल अटक केली होती. मात्र न्यायालयाने तुपकर याना जामीनावर सोडलंय. त्यानंतर तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.

  • 26 Nov 2023 08:15 AM (IST)

    पुण्यातील ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा

    पुण्यातील ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ससून रुग्णालयात तीन आठवडा पुरतील इतकेच सलाईन शिल्लक आहेत. सलाईनचा तीन आठवड्यांपुरताच साठा शिल्लक आहे. बाजारपेठांमध्ये सलाईनच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याने पुरवठा कमी असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय.  वेळेत पुरवठा व्हावा यासाठी ससून रुग्णालयाची धावपळ होताना पाहायला मिळतेय. 100 मिलिमीटर क्षमतेच्या सलाईनचा ससून रुग्णालयात तुटवडा होणार आहे.

  • 26 Nov 2023 07:53 AM (IST)

    पुण्यात संविधान दिनानिमित्त “संविधान सन्मान दौड”

    पुण्यात संविधान दिनानिमित्त “संविधान सन्मान दौड” काढण्यात येणार आहे.  संविधान सन्मान दौडचं पुण्यात आयोजन करण्यात आलंय.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे पुण्यात संविधान दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे विद्यापीठातून संविधान दौडला सुरुवात होणार आहे.  संविधान दौडमध्ये अपंग बांधवांचा देखील सहभाग असणार आहे.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संविधान दौडचं उद्घाटन करणार आहेत.

  • 26 Nov 2023 07:47 AM (IST)

    एसटी बसला अपघात, जण गंभीर जखमी

    सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात झालाय.  सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी एसटी बस पलटी झाली.  सोलापूरहून नांदेडला निघालेल्या बसला पहाटे सहा वाजता अपघात झाला. अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत. एसटी बसचा जॉईंट तुटल्याने हा भीषण अपघात झालाय. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : आज रविवारचा दिवस आहे. मात्र बऱ्याच घडामोडींची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींच्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. आधी जालन्यात मेळावा घेतल्यानंतर हिंगोतील आज ओबीसी मेळावा होत आहे. तसंच राज्यात आता ठिकठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागतेय. पण राजधानी मुंबईत मात्र पावसाने हजेरी लावली आहे. अनपेक्षितपणे पाऊस आल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. यासह राज्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

Source link