Maharashtra Breaking News Live in Marathi: Mumbai Maharashtra Today’s News

14:57 (IST) 8 Nov 2023

उपराजधानीत गुन्हेगाराकडून तब्बल ९ पिस्तूल जप्त; मध्यप्रदेशातून पुरवठा

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून पिस्तूलचा वापर वाढला होता. चक्क शहरातून २५ हजार रुपयांत पिस्तूलची विक्री केल्या जात होता. नागपूर शहरात आणि अन्य राज्यात अग्निशस्त्राचा पुरवठा करणाऱ्या आरोपीच्या तहसील पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

सविस्तर वाचा…

14:27 (IST) 8 Nov 2023

रेल्वेगाडीत फटाके आणणाऱ्या ११ जणांवर कारवाई

नागपूर: रेल्वेगाडी ज्वलनशील पदार्थ, वस्तू नेण्यास मनाई असताना फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या ११ जणांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई केली.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 8 Nov 2023

सरसेनापती कारखान्याच्या या हंगामातील साखर विक्रीचे अधिकार राजू शेट्टींना; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

साखर कारखान्यांची कर्जे एवढी वाढलेली आहेत की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

14:06 (IST) 8 Nov 2023

नागपूर: भावाच्या मुलीवर बलात्कार करून काका फरार; मुलीची प्रकृती गंभीर

नागपूर: सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर अमानुष बलात्कार करून काका फरार झाला. ही धक्कादायक घटना कोराडीत घडली. प्रमेश्वर (३४) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 8 Nov 2023

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजीत तावरेंची निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 8 Nov 2023

अमेरिकन डॉलर्स तस्करीप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक; दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन जप्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इथोपिया मार्गे टान्झानियाला जाणाऱ्या २६ वर्षीय परदेशी नागरिकाला सीआयएसएफच्या जवानांनी सोमवारी ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 8 Nov 2023

वर्धा: रेल्वे तिकिटाचा काळाबाजार! सीबीआय पथकाने केली एकास अटक

वर्धा: प्राप्त माहिती आधारे वर्धा रेल्वे स्थानकावर रेल तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागपूरच्या सीबीआय पथकास लागली होती. त्यांनी वर्धा रेल्वे पोलीसांची मदत घेत काळाबाजार करणाऱ्या बाबा अभिमान पाटील यास अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 8 Nov 2023

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल; निर्वाह भत्त्यापासून वंचित, स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही नाहीत

यवतमाळ: राज्यातील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी २०२३ चे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नसल्याची बाब काही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणूनही शासनस्तरावर उपाययोजना न झाल्याने विद्यार्थी खिशातून खर्च करत असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

13:26 (IST) 8 Nov 2023

बळीराजासाठी आनंदवार्ता! दिवाळीपूर्वी २.११ लाख शेतकऱ्यांना १२२ कोटींची मदत; पीक विम्याची २५ टक्के नुकसान भरपाई अग्रीम मिळणार

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा खरीप योजनेत शासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीला दिले आहेत.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 8 Nov 2023

एसटी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आंदोलनाचे आवाहन? कामगार संघटनांमध्ये स्पर्धा

नागपूर: एसटी महामंडळाच्या संघटनांमध्ये आंदोलन पुकारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रथम कामगारांच्या मान्यताप्राप्त संघटनेने आंदोलनाची घोषणा केली, ६ नोव्हेंबरला ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेने आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 8 Nov 2023

मुंबई : सहार पोलिसांच्या ताब्यातून बांगलादेशी महिलेचे पलायन

ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचालयात गेली. तेथून नजर चुकवून तिने पलायन केले.

सविस्तर वाचा…

13:03 (IST) 8 Nov 2023

दिवाळीत प्रवाशांच्‍या सोयीसाठी ४० विशेष बसगाड्या; तिकीट दरात मात्र दहा टक्‍के वाढ

अमरावती: दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, संभाजीनगर, जालना, अहमदनगर या शहरांसाठी ४० तर जिल्हातंर्गत शहरांसाठी विशेष बस धावणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 8 Nov 2023

भुजबळांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची नराजी; म्हणाले, “काही लोक मतपेटीचा हिशेब करून…”

एकीकडे राज्य सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, “मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळेल, कुणबी नोंदी सापडतायत, त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. जे मराठा आहेत, तेच कुणबी आहेत आणि हे १०० टक्के सत्य आहे.” छगन भुजबळांबाबत बच्चू कडू म्हणाले, “भुजबळांनी आम्हाला सांगावं की मराठा कुणबी नाही तर कोण आहे? मराठा हा कुणबीच आहे. पण काही लोक मतदानाच्या पेटीचा हिशेब करून हे मुद्दे पुढे करून राजकीय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात आहेत. ते चुकीचं आहे.”

12:58 (IST) 8 Nov 2023

ताडोबात सात वाघ एकाच वेळी एकत्र

चंद्रपूर: जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचे कुटुंब एकत्र दिसले. सात वाघ एकाच वेळी दिसण्याचा हा दुर्मिळ प्रसंग कॅमेरा मध्ये टिपण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 8 Nov 2023

सर्व सेवा संघ करणार देशभरात आंदोलन; अध्यक्षपदी चंदन पाल यांची निवड

वर्धा: सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी चंदन पाल यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सेवाग्राम आश्रमात संपन्न सेवा संघाच्या ९०व्या अधिवेशनात देशभरातील १५ राज्यातून तीनशेवर प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 8 Nov 2023

दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणीटंचाई; नेरुळ, सारसोळेवासीयांचा आंदोलनाचा इशारा

लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सोबत घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 8 Nov 2023

आता मैदानांच्या जमिनीवर शाळा, शाळांच्या पुनर्विकासासाठी नवे धोरण; वाढीव चटई निर्देशांक वापराची व्यवस्थापनांना मुभा

उपनगरांमध्ये उभारलेल्या शाळांच्या जुन्या इमारती पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर असून यासंबंधी आखण्यात आलेल्या नव्या धोरणामुळे शाळा आणि मैदानांचे चित्रच पालटणार आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 8 Nov 2023

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमजोर, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची स्पष्ट कबुली

पत्र परिषदेत तटकरे यांनी सतत २५ वर्ष विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर असल्याचे मान्य केले.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 8 Nov 2023

धक्कादायक! चहा न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करता निघून गेले, चौकशी होणार

शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 8 Nov 2023

नौदल अधिकाऱ्याकडे सेक्सटॉर्शनची मागणी; अडीच लाखांची खंडणी स्वीकारली

नौदल अधिकाऱ्याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत तयार करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 8 Nov 2023

रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आपतकालीन खिडकीतून मुलगा रेल्वेत दाखल झाला. त्यानंतर आसनावरील लोखंडी साखळीच्या सहाय्याने गळाफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 8 Nov 2023

“हसन मुश्रीफ महादेव अ‍ॅपचे सदस्य”; राऊतांच्या आरोपावर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आल्याने या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (३ नोव्हेंबर) केला आहे. यावर बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “भूपेश बघेल भाजपात गेले किंवा त्यांनी भाजपाला मदत केली तर भाजपात त्यांना देवाचं स्थान मिळेल. हे लोक ‘महादेव अ‍ॅप’चं ‘हर हर महादेव अ‍ॅप’ करतील. भूपेश बघेल यांच्यावर अभिषेक केला जाईल. हे अगदीच खरं आहे. तुम्ही हवं तर महाराष्ट्रात पाहा. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हेसुद्धा महादेव अ‍ॅपचे सदस्य आहेत. आता त्यांची पूजा केली जात आहे. तुम्ही (भाजपा) यांना तुरुंगात डांबणार होता. परंतु, आता यांची पूजा करत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पवार-भुजबळ-मुश्रीफांवर फुलं उधळत आहेत.” संजय राऊत यांच्या या टीकेवर आता मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, हे महादेव अ‍ॅप काय आहे तेच मला माहिती नाही. मी संजय राऊतांना भेटलो तर त्यांच्याकडून याची माहिती घेईन. तसेच महादेव अ‍ॅप काय आहे ते जाणून घेईन.

10:24 (IST) 8 Nov 2023

“…तेव्हा तुमचा हिशेब होईल”, ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचं पोलीस-ठाणे महापालिकेला इशारा

ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शाखेवर महापालिकेने कारवाई केली आहे. या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला असून त्या जागी नवीन इमारत बांधली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शाखेवर झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून सरकारला धारेवर धरलं.

खासदार राऊत म्हणाले, मुळात राज्यातल्या बेकायदेशीर सरकारवर बुलडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. या घटनाबाह्य सरकारच्या गुंडांनी आणि माफियांनी ठाणे-मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला. ज्या शाखा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केल्या, त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. असं करताना यांना लाज वाटत नाही का? महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का? हिंमत असेल तर समोर या. ठाण्यातल्या या सगळ्या प्रकारामुळे येत्या ११ नोव्हेंबरला सायंकाळी चार वजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे शिवसेनिक मुंब्र्याला जाणार आहोत. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवला तिथे आम्ही जाणार आहोत. जनतेला भेटणार, त्यांच्याशी संवाद साधणार. हवं तर बुलडोझर घेऊन या आणि आमच्यावर फिरवा.

खासदार संजय राऊत म्हणाले, माझं पोलिसांना आव्हान आहे, लवकरच तुमचाही हिशेब होईल. ज्यांनी बुलडोझर फिरवले त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आव्हान आहे, २०२४ नंतर तुमचाही हिशेब केला जाईल. याला तुम्ही इशारा म्हणा किंवा धमकी म्हणा, तुम्ही याला काहीही म्हणू शकता.

Source link