Maharashtra Weather News Update in Marathi: Kolhapur Accident Latest News| kartiki ekadashi 2023

15:21 (IST) 23 Nov 2023

तमाशातील मृत कामगारांच्या नातेवाईकांचा आक्रोश; पार्थिव घेण्यास नकार, जिल्हा रुग्णालयात तणाव

परिसरात दिर्घकाळ तणाव होता. शवविच्छेदन गृहाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 23 Nov 2023

नागपूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काल रक्तदान, आज निदर्शने; स्थायी करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांकडून स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 23 Nov 2023

“… तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करु”; बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं खुलं आव्हान

अंनिसचं हे खुलं आव्हान धिरेंद्र शास्त्री महाराज स्वीकारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 23 Nov 2023

मुंबईतील रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार, ताशी १३० किमी वेगाने रेल्वे धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि वेळेत होण्यासाठी, रेल्वे गाड्यांची गती वाढवण्यावर रेल्वे प्रशासन भर देत आहे. मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून गाड्यांचा वेग वाढवण्यात येत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या १२०६.७३ किमी रेल्वे मार्गावरून ताशी १३० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावण्यास सज्ज आहेत. येत्या काळात मुंबई विभागातील सीएसएमटी ते कसारा, कर्जत दरम्यान ताशी १३० वेगाने रेल्वेगाडी धावण्यास सज्ज होणार आहे.

सविस्तर वाचा…

14:52 (IST) 23 Nov 2023

मुंबई : कोट्यवधींच्या खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक

मुंबई : कोलकात्यातील जमिनीत दडवलेला हजारो कोटी रुपयांचा खजिना सापडला असून त्याचा लाभार्थी बनवण्याचे आमिष दाखवून मुंबईमधील भुलेश्वर परिसरातील ५८ वर्षीय व्यक्तीची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

14:36 (IST) 23 Nov 2023

राज्यातील शाळांमध्ये आता ‘वाचन चळवळ’, शालेय शिक्षण विभागाची मान्यता

पुणे – राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात इयत्ता तिसरीच्या ३० टक्केपेक्षा जास्त मुलांना लहान मजकूर, पाचवीपर्यंतच्या ४१ टक्के मुलांना त्यांच्या श्रेणीचा योग्य मजकूर वाचता येत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

14:31 (IST) 23 Nov 2023

नवी मुंबई: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक

नवी मुंबई: सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केट हे गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मात्र त्याचा अभ्यास आवश्यक असल्याचे नियमित गुंतवणूक सांगतात.

सविस्तर वाचा…

14:30 (IST) 23 Nov 2023

“अपराधी वाटण्याचं कारण काय?” कॅसिनोमधील फोटोवरून राऊतांचा बावनकुळेंना प्रश्न; म्हणाले, “साडेतीन कोटी…”

चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोमधला फोटो शेअर करत संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं होतं. त्यावर रावसाहेब दानवेंसह अनेक भाजपा नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मकाऊला जाणं हा गुन्हा आहे असं मी कुठे म्हणतोय? पण तुम्ही लपवताय कशाला? तिथे कॅसिनो, पर्यटनातून चीननं आपली अर्थव्यवस्था भक्कम केली. जर बावनकुळे हे पाहायला गेले असतील तर त्यात अपराधी वाटण्याचं काय कारण आहे? खुलासे का करताय? उडवले असतील त्यांनी साडेतीन कोटी रुपये, आहेत त्यांच्याकडे पैसे. मान्य करा आणि शांत बसा. दानवे किंवा त्यांचे इतर लोक खुलासे का करतायत? त्यांचं मन का खातंय? तुम्ही मकाऊला जाऊन असं काय केलंय?”

14:15 (IST) 23 Nov 2023

मेळघाटात आढळल्‍या ८७ फुलपाखरू प्रजाती; पाच प्रजातींची प्रथमच नोंद

अमरावती : मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पात नुकत्‍याच झालेल्‍या फुलपाखरू सर्वेक्षणात एकूण ८७ फुलपाखरू प्रजातींची नोंद करण्‍यात आली असून पाच प्रजाती प्रथमच आढळून आल्‍या आहेत.

सविस्तर वाचा…

14:11 (IST) 23 Nov 2023

“राजू शेट्टी, स्वाभिमानीशी फारकत घेतली काय?” रविकांत तुपकर म्हणतात, “मी आजही….”

तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली का? हा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः रविकांत तुपकर यांनीच दिले.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 23 Nov 2023

पुणे : ‘ससून’चा कारभार अधांतरी! नवीन अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा आदेशच नाही

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. काळे हे अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारून लगेचच रजेवर गेले. मात्र, तब्बल ११ दिवसांनंतरही डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश न निघाल्याने ससूनचा कारभार अधांतरी सुरू आहे.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 23 Nov 2023

“पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल

कार्तिकी एकादशीला जे भाविक व वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते दरवर्षी शेगावात दाखल होऊन श्रीचरणी नतमस्तक होतात.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 23 Nov 2023

पुणे स्थानकावर ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’! प्रवाशांसाठी अनोखी सुविधा सुरू

पुणे : रेल्वेने गाडीच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह सुरू करण्याची अभिनव योजना राबविली आहे. पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह बुधवारपासून (ता. २२) सुरू करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 23 Nov 2023

संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार १२ डिसेंबरला नागपुरात, विधानभवनावर धडकणार यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांची संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर धडकणार आहे.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 23 Nov 2023

नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ

कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 23 Nov 2023

विदर्भात आज पावसाची शक्यता! किमान तापमान कमी, मात्र गारवा कायम…

२३ व २४ नोव्हेंबरदरम्यान विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 23 Nov 2023

जन्मजात मेंदूत संक्रमण असलेल्या बाळाला जीवदान; मेडिकलच्या डॉक्टरांना यश

बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 23 Nov 2023

सागरी व खाडी प्रदुषणामुळे छोट्या पारंपारिक मच्छिमारांचा व्यवसाय घटला; ताज्या मासळीचा तुटवडा जाणवू लागल्याने कुटुंबावर उपासमार

उरण: उरण- पनवेलच्या विविध खाड्या, किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे. तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजविण्यात येत आहेत. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 23 Nov 2023

तलाठी भरतीतील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

जुन्या अधिसूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसींच्या ४६ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 23 Nov 2023

पनवेल: नववीच्या वर्गात काढलेल्या एका लज्जास्पद छायाचित्रामुळे विद्यार्थीनीने जिवनयात्रा संपविली

पनवेल: करंजाडे वसाहतीमध्ये नववी इयत्तेत शिकणा-या विद्यार्थीनीने घरातील गॅलरीमध्ये गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. ही घटना १ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता घडली. सविस्तर वाचा….

12:40 (IST) 23 Nov 2023

डोंबिवली एमआयडीसीत धुळीचे लोट, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एमआयडीसीकडून कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी

डोंबिवली – हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत. पालिका, पोलीस, वाहतूक सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. परंतु, डोंबिवली एमआयडीसी परिक्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत. धुळीमुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 23 Nov 2023

दिवाळीच्या सुट्ट्या रक्तदानाच्या मुळावर; मुंबईसह नवी मुंबई परिसरात रक्ततुटवडा

नवी मुंबई: दिवाळी सुट्ट्यांमुळे राज्यात सर्वच ठिकाणी रक्त तुटवडा जाणवत आहे. निगेटिव्ह ग्रुपचे रक्त जवळपास संपल्यात जमा आहे. याची गांभीर्याने दखल घेत नियमित रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

सविस्तर वाचा…

12:24 (IST) 23 Nov 2023

सणासुदीची वाहनखरेदी जोरात! जाणून घ्या पुणेकरांची पसंती कशाला…

पुणे : सणासुदीच्या काळात वाहने खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदा दसरा ते दिवाळी या कालावधीत पुण्यात २५ हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत सुमारे ३ हजाराने वाढ झाली असून, ग्राहकांची सर्वाधिक पसंती दुचाकींना आहे.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 23 Nov 2023

आठ वर्षांच्या अडथळ्यानंतर नवी मुंबईतील जुन्या सांस्कृतिक-सामाजिक संस्था पुन्हा एकाच छताखाली येणार

नवी मुंबई: अनेक अडथळ्यांनंतर वाशी सेक्टर ३ येथे पालिकेची बहुउद्देशीय इमारत उभी राहिली असून बरीच वर्षे विविध ठिकाणी भाड्याने जागा घेऊन कार्य करणाऱ्या साहित्य-संस्कृती, कला, सामाजिक संस्था पुन्हा एकाच छताखाली आल्याचा आनंद जुन्याजाणत्या नवी मुंबईकरांसह नेटाने संस्था चालवणाऱ्या संस्थांना झाला आहे.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 23 Nov 2023

पिंपरी : सात लाचखोर कर्मचारी पुन्हा सेवेत, ‘यांच्या’ शिफारशीवरुन घेतला निर्णय

पिंपरी : उद्यान, नगररचना आणि आरोग्य विभागाच्या सात लाचखोर निलंबित कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुन्हा सेवेत घेतले आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार सेवेत घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 23 Nov 2023

डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये रस्त्याच्याकडेचे झाड तोडल्याने नाराजी, रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

डोंंबिवली – येथील पूर्व भागातील सुनील नगरमधील ग प्रभाग कार्यालयासमोरील रस्ते, गटाराला बाधा न येणारे बहरलेले गुलमोहराचे जुने झाड तोडण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 23 Nov 2023

नागपूर महापालिकेची नियोजनशून्यता, २२ पैकी फक्त दोन ठिकाणी वाहनतळ; अन्य जागांचे प्रस्ताव धूळखात

महापालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहने कोठे उभी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 23 Nov 2023

शहीद गोवारी स्मृती दिन आज : गोंडगोवारी असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित; काय आहे गोवारी समाजाच्या समस्या?

दरवर्षी २३ नोव्हेंबरला शहीद बांधवांना आदरांजली वाहिली जाते. यावेळी अनेक नेतेही आदरांजली अर्पण करून गोवारी समाजाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देतात.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 23 Nov 2023

पिंपरी-चिंचवडमधील ३० हजार इलेक्ट्रिक वाहनचालक हैराण! ‘हे’ आहे कारण

पिंपरी : शहरातील नागरिकांना विजेवरील वाहने चार्जिंग करण्याची सुविधा देण्यासाठी महापालिकेने २२ ठिकाणी खासगी संस्थेद्वारे चार्जिंग स्थानके उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, दीड वर्षात तीन वेळा राबविलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे आता निविदेमधील अटी-शर्तीत बदल करून चौथ्यांदा सुधारित निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.

सविस्तर वाचा…

12:08 (IST) 23 Nov 2023

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची रातोरात धरपकड; थोड्या वेळात राष्ट्रीय महामार्ग रोखणार

हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी झालेली आहे.

सविस्तर वाचा…

12:07 (IST) 23 Nov 2023

“ओबीसींना लोकसंख्येनुसार ५२ टक्के आरक्षण द्या”, प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची मागणी

५२ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात यावे. त्यानंतर इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लोकजागर अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सविस्तर वाचा…

12:07 (IST) 23 Nov 2023

पुणे : धक्कादायक..! पेट क्लिनिकमध्येच गळफास लागून श्वानाचा मृत्यू

पुणे : लसीकरणासाठी आणलेल्या श्वानाचा गळफास लागून मृत्यू झाल्या प्रकरणी दोन पशुवैद्यकीय तज्ज्ञांसह चौघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाषाण परिसरातील एका पेट क्लिनिकमध्ये ही घटना घडली.

सविस्तर वाचा…

12:06 (IST) 23 Nov 2023

विठोबा, तुकोबाराय अन् मिरची… असे पडले खोपोलीच्या विठ्ठल मंदिराचे नाव ‘बोंबल्या विठोबा’

दरवर्षी कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. यात्रे निमित्ताने लाखो भाविक ताकई येथे दाखल होत असतात.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 23 Nov 2023

बीपीसीएल कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू

पनवेल: तालुक्यामधील जुन्या पूणे मुंबई महामार्गावर बारवाई गावासमोरील मार्गात दुचाकीवरुन रेल्वेस्थानकापर्यंत जाणा-या एका दुचाकीस्वाराला अनोळखी वाहनाने पाठीमागून धडक देऊन ठार केले. या अपघातामध्ये ५६ वर्षीय अनैय्या दोडाघट्ट रंगप्पा यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 23 Nov 2023

“छगन भुजबळांना भाजपाकडून ऑफर असल्यामुळे…”, मनोज जरांगेंचा मोठा दावा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझं मराठा समाजाला आव्हान आहे की शांततेत राहा. कारण आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. छगन भुजबळांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर आणि विरोधावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलं असावं. नाहीतर त्यांना भाजपाकडून काहीतरी ऑफर आली असेल. किंवा भाजपाने त्यांना पाठबळ दिलं असेल. कारण गृहमंत्री यावर काही बोलत नाहीत. गृहमंत्री त्यांना (भुजबळांना) थांबवत नाहीत. आरक्षण देतो सांगून मराठा समाजाला त्रास देण्यासाठी पलटी मारायचं ठरलंय की काय अशी शंका येत आहे.

Source link