Today’s Breaking News: NCP Party EC Hearing Live | SC NCP Hearing Live Updates Sharad Pawar AJit Pawar Congress BJP Shivsena

14:10 (IST) 9 Oct 2023

“महामंडळ संस्थांचे कमिशन देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे…”, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा निर्णय

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार तर्फे आधारभूत किमान धान खरेदी योजना मुख्य अभिकर्ता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ तथा उपअभिकर्ता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, धान खरेदी करीत आहे.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 9 Oct 2023

प्रफुल्ल पटेल यांच्या गृहजिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार; युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह ३०० कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल  यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह सुमारे ३०९ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सविस्तर वाचा

13:30 (IST) 9 Oct 2023

धुळ्याजवळ गुटख्याची वाहनातून वाहतूक; ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त

धुळे: दिल्लीहून मुंबईकडे बेकायदेशीरपणे होणारी गुटख्याची वाहतूक धुळे पोलिसांनी रोखली असून कंटेनरसह ४८ लाख ४३ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर वाचा….

13:27 (IST) 9 Oct 2023

मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबीचा येवल्यात अपघात, ३ जण जखमी

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील आज नाशिकच्या येवला शहरात येणार आहेत. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यासाठी आणलेल्या जेसीबीचा येवल्यात अपघात झाला आहे. जेसीबीचा हायड्रा अचानक खाली आल्याने हा अपघात झाल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने प्रसिद्ध केली आहे. जेसीबीच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच शांतीपुष्प रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

13:15 (IST) 9 Oct 2023

घर रिकामे करण्यासाठी खंडणीची मागणी; धुळ्यात भाडेकरुंच्या धमकीमुळे घरमालकाची आत्महत्या

धुळे: घर रिकामे करून हवे असल्यास पाच लाख रुपये द्यावेत, अन्यथा ॲट्राॅसिटी विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करू, अशी धमकी भाडेकरुंनी दिल्याने शहराजवळील मोहाडी उपनगरात घरमालकाने गळफास घेतला.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 9 Oct 2023

बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार स्वयंविकास पॅनेलकडे

पनवेल: बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार स्वयंविकास पॅनेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी झालेल्या गृहनिर्माण संस्थेच्या निवडणूकीचा निकाल रविवारी सायंकाळी खारघर येथील एस. सी. पाटील महाविद्यालयात जाहीर झाला.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 9 Oct 2023

पिंपरी-चिंचवडमधील ‘ते’ भीषण स्फोट अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करताना

या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड शहरातील अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करणाऱ्या टोळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अगोदर देखील गॅस रिफ्लिंग करताना काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 9 Oct 2023

कल्याण-डोंबिवलीत ‘चला होऊ द्या चर्चा’ सभेला परवानगी नाकारली, डोंबिवलीत ‘उबाठा’चा मूक मोर्चा

हा कार्यक्रम केंद्र, राज्य सरकारच्या भूमिका, धोरणे आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवित असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी डोंबिवली, कल्याणमधील या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 9 Oct 2023

डोंबिवली पूर्वेतील सरकता जिना बंद, प्रवाशांचे हाल

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सरकता जिना मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. उद्वाहन दर दोन दिवसाआड बंद पडते.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 9 Oct 2023

इंडीया बूल्स महागृहनिर्माण प्रकल्पात पाण्यासह इतर सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन

इंडीया बूल्सचा हा महागृहनिर्माण प्रकल्प असून यामध्ये ३२०० सदनिका आहेत. ३२ मजल्यांच्या सतरा इमारतींमध्ये हे रहिवाशी राहतात.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 9 Oct 2023

चाळीसगावात अफू बोंडासह चुरा मिळून २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव: चाळीसगाव येथील रेल्वेस्थानकाजवळील मालधक्का भागात मोटारीतून नऊ गोण्यांमधील सुमारे १८ लाख २ हजार ४०० रुपये किमतीची अफूची बोंडे व बोंडाचा चुरा, तसेच १० लाखांची मोटार मिळून सुमारे २८ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाविरुद्ध चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 9 Oct 2023

महाविकास आघाडीची मते फोडण्यासाठी भाजपकडून तिसऱ्या आघाडीला बळ?

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडण्यासाठी राज्यात तिसऱ्या आघाडीला भाजप बळ देत असून त्याविरोधात ‘इंडिया’कडून रणनिती निश्चित केली जात असल्याची माहिती या घडामोडींशी निगडीत सूत्रांनी दिली.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 9 Oct 2023

“राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 9 Oct 2023

थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविल्यानंतर पुणे विमानतळ व्यवस्थापन अखेर हलले

पुणे : पुणे विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) विमानतळावर उपलब्ध नव्हता. याबाबत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि विमानतळावर एईडी बसविण्यात आला.

सविस्तर वाचा..

12:24 (IST) 9 Oct 2023

“साहेब मुलगा लांब नोकरीला, आम्ही वृद्ध, त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करा”; वृध्दांची गडकरींना विनंती

सर्व सामान्य माणसांचे जगण्याचे प्रश्न फक्त दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपुरतेच मर्यादित नसून ते  त्या पलिकडचेही आहेत याचा प्रत्यय  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनता दरबारात रविवारी आला.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 9 Oct 2023

सावधान! ई-सेवा केंद्राच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे!; अनेक टोळ्या सक्रिय

महाविद्यालयातील शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखल अशा विविध स्वरूपाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, ई-सेवा केंद्राच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

सविस्तर वाचा

12:21 (IST) 9 Oct 2023

अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या श्रेयावरून चढाओढ; ‘या’ सरकारच्या काळातच निधी, पदे

शहरातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या श्रेयावरून चढाओढ सुरू झाली आहे. रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप नेते करीत असून रुग्णालयासाठी निधी व पदे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच मंजूर झाल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केला आहे.

सविस्तर वाचा

12:19 (IST) 9 Oct 2023

अनैतिक मानवी वाहतुक, अकोटची मुलगी आढळली मुंबईत; १०३ प्रकरणांचा उलगडा

जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून आतापर्यंत १०३ प्रकरणांचा उलगडा केला. जिल्ह्यातील एका प्रकरणात अकोट येथील मुलगी मुंबईमध्ये आढळून आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादंवि तसेच महिला, मुलींच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करण्यात येतो.

सविस्तर वाचा

12:19 (IST) 9 Oct 2023

गोरेगाव आग दुर्घटनेनंतर ‘झोपु’ प्राधिकरणाचा निर्णय; सात मजली इमारतींना लोखंडी जिने

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गोरेगावमधील उन्नत नगर येथील ‘जय भवानी’ इमारत दुर्घटनेनंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला जाग आली आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झोपु योजनेतील सर्व इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

12:16 (IST) 9 Oct 2023

“पेपर नीट घेणे झेपत नसेल तर राजीनामा द्या, महाराष्ट्र कसा सांभाळता?”; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

स्पर्धा परीक्षा समितीने फुटलेला पेपर काल एक्स वर जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे. ते गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलिस भरतीचा पेपर फुटला होता.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 9 Oct 2023

‘नीट’ परीक्षेसाठी आता नवा अभ्यासक्रम!; जाणून घ्या सविस्तर

नीट पदवीधर २०२४ परीक्षेसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड कडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 9 Oct 2023

गोंदिया : ६० रुपयांच्या उधारीने घेतला मित्राचा जीव, मित्रानेच केली गळा दाबून हत्या

जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोदा गावात मैत्रीला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. फक्त ६० रुपयांच्या उसनवारी वरून झालेल्या वादाची परिणीती अशी की मित्रानेच  गळा आवळून खून केला.

सविस्तर वाचा

Source link